लोकांसमवेत आग्र्यात गेले, जेव्हा ते बादशहा भेटीस निघाला तेव्हा त्यांच्यासोबत असणारा लवाजमा हा अगदी मोजकाच असावा असे चित्र बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर
आहे परंतू मिर्झा राजे जयसिंग यांचा मुलगा रामसिंग यांच्या पदरी असलेल्या एका मुंशीने आपल्या राजांचे आणि त्यांच्या रुबाबदार लवाजम्याचे केलेले वर्णन एकदा वाचाच
ही नोंद त्या मुंशीने लिहिलेल्या पत्रामध्ये आहे-
शिवाजींचा बांधा सडसडीत आणि उंची मध्यम आहे रंग गोरापान चेहऱ्यावर दाढी आणि कमालीचा करारीपणा. वागण्यात धैर्य बोलण्यात संयम असा की शिवाजी कितीही
लोकांत असले तरी हा राज आहे हे कोणीही न सांगता लक्षात येतं. राजांच्या सोबत ९ वर्षाचे देखणे गोरेपान संभाजी आहेत, लवाजम्यात तुर्की पागोटे घातलेले नोकर पुढे
चालतात. त्यानंतर झेंड्याचा हत्ती हत्तीवर अंबारी अंबारीवरच्या झेंड्याचा रंग भगवा आहे. झेंड्यावर सोनेरी नक्षीकाम झेंड्यामागे घोडदळ पायदळ मध्ये राजांची पालखी चालते
पालखी चांदीच्या पत्र्याने मढवलेली आहे, पालखीचे पाय सोन्याचे आहेत. त्यानंतर संभाजीराजेंची पालखी त्यामागं रिकामे हौद असलेल्या हत्तीणी डौलात चालतात, नंतर
सरदारांचा पालख्या, शेवटी उंट बैल आणि पिचाडीचे सैन्य. एक स्वतंत्र राजा बादशहाच्या भेटीला आल्यासारखा महराजांचा लवाजमा होता
पुढे या पत्रलेखकाने आपलाच मालक मिर्झा राजेला शिवाजींना आग्र्यात पाठवल्याबद्दल दूषण दिली आहेत.