१२/१३/२०१४

चायनीजची चटक!



सध्या चायनीज पदार्थांची सर्वांनाच चटक लागली आहे. बाहेर जेवायला जायचं म्हटलं की, बरेचजण चायनीज खाण्याचाच बेत करतात; पण चायनीज पदार्थांचे अतिसेवन आरोग्यासाठी धोकादायक आहे.

चायनीज गोष्टींचं आकर्षण अनेकांना आकर्षण असते. अगदी चिनी बनावटीच्या वस्तूंपासून चायनीज पदार्थांपर्यंत. चायनीज पदार्थांची तर सध्या सर्वांनाच चटक लागली आहे; पण चीनमध्ये मिळणारे चायनीज पदार्थ आणि भारतात मिळणारे चायनीज पदार्थ यात फरक आहे. भारतीयांच्या जिभेला पूरक ठरतील, अशा चवीचे हे पदार्थ तयार केलेजातात. रस्त्याशेजारी फुटपाथवर गल्लोगल्ली मिळणारे चायनीज पदार्थ सहज आणि स्वस्तात उपलब्ध होत असल्यामुळं तेच खाण्याकडे बहुतेकांचा कल असतो. हॉटेल्स आणि रेस्टॉरण्टच्या तुलनेत हे पदार्थ स्वस्तात द्यायचे, तर त्यांचे कूक अनेक तडजोडी करतात. त्यात निकृष्ट दर्जाचे तेल आणि भाज्या वापरल्या जातात. त्यातही आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात वापरला जाणारा अजिनोमोटो पचनसंस्थेसह शरीराचे इतरही नुकसान करू शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. चायनीज पदार्थांमध्ये मोनोसोडियम ग्लुटामेट, शेजवान सॉस, कृत्रिम रंग, स्टार्च कॉर्न यासारखे जिन्नस वापरल्यामुळे पचनशक्तीवर ताण येऊन ती बिघडू शकते. भात, बांबूंची मुळे, मशरूम्स, नूडल्स हे चिनी लोकांचे स्टेपल फूड आहे, तसे ते आपले नाही. नूडल्स, चिकन किंवा मांस अर्ध कच्चे शिजवले गेले तर ते पचायला हानीकारक असते. शिवाय मैदा आतड्यात जाऊन चिकटत असल्यामुळे त्याचा अतिरेकी वापर घातक आहे. रोडसाईड चायनीज फूडमध्ये वापरला जाणारा तांदूळही पॉलिश्ड किंवा रिफाइंड असल्यानं पचनसंस्थेसाठी हितकर नसतो. चायनीज पदार्थांना चव आणणार्‍या अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)च्या अतिरिक्त वापरामुळे या पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकते, असं आढळून आलं आहे. 'अजिनोमोटो' नावाची कंपनी तयार करत असलेल्या 'फ्लेव्हर एण्हान्सर'चे शास्त्रीय नाव 'मोनोसोडियम ग्लुटामेट' असून त्यात सोडियम, कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन ही मूलद्रव्यं असतात. व्हिनेगरप्रमाणेच अजिनोमोटोही आंबवण्याच्या प्रक्रियेतून तयार होते. अनेक भाज्या, सॉसेस, सूप, मांस, मासे, अंडी यामध्ये अजिनोमोटो चांगल्या रीतीनं मिसळू शकतो; पण तो जास्त वापरला गेला तर मात्र पदार्थांंची चवच बिघडतंेअसे नाही, तर खाणार्‍यांचे आरोग्यही बिघडू शकते.






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search