काहीच कळेना आता मला,
जेव्हा पासुन पाहिलो तुला...
केवळ तूझ्याच आठवणीत मी,
हरवलेलो असतो माझ्या मला....
तुझ्या गोजिरी रुपाचं चादणं,
माझ्या मनास वेड लावलं...
अन् स्वप्नाच्या दुनियात मी,
तूझ्या गंधाळवाणी अदा पाहिलं...
छणछण वाजणारी ती पैजण,
शोभुन दिसत तुझ्या पायाला...
जणु हद्याच्या सप्त सुराना,
ही नवासा साद पण गवसला....
तुझ्या नाजुक डोळ्याची हया,
करी माझ्या हद्याला फिदा...
अन् वेड हद्य माझ्यापासुन,
नकळत प्रेमात होई युही जुदा...
आता वेड्या मनात फक्त तीच,
तिच्या गोड अदा मनात साठली...
अन् तीच जगणाच्या वाटेवरची,
जणु माझी स्वप्न सुंदरी वाटली...!!