स्पाईस कंपनीनं भारतीय बनावटीचं पहिला स्मार्टवॉच मार्केटमध्ये आणला आहे. विशेष म्हणजे या स्मार्टवॉचमध्ये दोन सिमकार्डही वापरता येणार आहेत. स्मार्ट पल्स एस 9010 नावाची हे स्मार् वॉच भारतीय गॅझेट प्रेमींसाठी एक उत्तम भेट ठरते आहे. नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी वापरताना या स्मार्टवॉचचा वापर युझर्स एखाद्या मोबाईल फोनसारखा करु शकतात. अशी प्रकारची हे पहिलंच गॅझेट आहे.
या स्मार्टवॉचची सर्वात महत्वाची बाब म्हणजे किंमत. स्पाईसची या बहुगुणी स्मार्टवॉचची किंमत आहे फक्त 4,999 रुपये. होमशॉप-18 वर तुम्ही हे गॅझेट याहून कमी किंमतीत खरेदी करु शकता. हो, होमशॉप-18 वर या स्मार्टवॉचची किंमत केवळ 3,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचच्या विक्रीला सुरुवात झाली आहे.
1.57 इंच स्क्रीन असलेला या स्मार्टवॉचचं रिजोल्यूशन 240x320 पिक्सल आहे. एस9010 या स्मार्टवॉटद्वारे तुम्ही आऊटगोईंग कॉल करु शकता आणि कॉल रिसिव्ह देखील करु शकतात. तसंच तुमच्या नंबर्सवर आलेले टेक्स्ट मॅसेज वाचणं तसंच पाठवणं हे देखील तुम्हाला या स्मार्टवॉचद्वारे शक्य होणार आहे. तसंच स्मार्टवॉच टचस्क्रिन असल्यानं तुम्हाला त्याद्वारे इंटरनेटचाही वापर करता येणार आहे.
त्यामुळं अशा ही अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण हे स्मार्टवॉच तुम्हाला आजच्या टेक्नोस्नॅवी जगात नक्कीच उपयोगाचं ठरणार आहे. आणखी एक आनंदाची बाब म्हणजे, सध्या या स्मार्टवॉचच्या खरेदीवर स्पाईसच्या वतीनं तुम्हाला ब्लू-टूथ हेड़फोनही फ्री दिला जातो आहे. या ब्लूटूथच्या मदतीनं तुम्ही तुमचा स्मार्टवॉच कोणत्याही अँड्रॉईड स्मार्टफोनशी कनेक्ट करु शकतात.
एकदा की तुमची हे स्मार्ट घड्याळ अँड्रॉईडला फोनला जोडलं की, मग अँड्राईडची सर्व फिचर्स, सर्व अॅप तुम्हाला वापरता येतील. त्याद्वारे तुम्ही कॅमेरा फंक्शन्स कंट्रोल करु शकतात. तसंच गाणी ऐकणं, नोटीफिकेशन्स पाहणं आणि सोशल मीडियाशी संबंधीत अॅप्स डाऊनलोड करणं अशा अनेक गोष्टींसाठी तुम्ही या स्मार्टवॉचचा वापर करु शकतात.
पण यात कच्चा दूवा आहे, तो म्हणजे या वॉचला 3जी सपोर्ट नाही. त्यामुळं युझर्सला केवळ 2जी नेटवर्कचाच फायदा घेता येईल. तसंच या स्मार्टवॉचवर ई-मेल सुविधेचा देखील उपयोग करता येणार नाही.
पण केवळ 4,999 रुपयात आणि जर तुम्ही होमशॉप-18 वर खरेदी करणार असाल तर मग केवळ 3,999 रुपयात मिळणारं या स्मार्टवॉचचे फीचर्स नक्कीच उत्तम म्हणता येतील. त्यामुळं भारतीय बनावटीचं स्पाईस स्मार्ट पल्स एस 9010 हे स्मार्टवॉच खरेदी करणं नक्कीच फायद्याची ठरेल.
ABP Majha