To book this Phone Click here
मायक्रोमॅक्सचा बहुचर्चित युरेका स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. या मोबाईलसाठी आता रजिस्ट्रेशन सुरु आहे. मात्र फोनची डिलिव्हरी 8 जानेवारीपासून सुरू होईल.
युरेका ब्रँडचा हा स्मार्टफोन भारताचा पहिला सायनोझेन ऑपरेटिंग सिस्टिमचा फोन आहे. महत्त्वाचं म्हणजे या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. त्यामुळे सर्वात स्वस्त असा हा सायनोझेन स्मार्टफोन आहे
या फोनची वैशिष्ट्य
1. फ्लॅश सेल :
युरेका या फोनचीही विक्री चायनीज स्मार्टफोन Mi3 प्रमाणे फ्लॅश सेलने होईल. मायक्रोमॅक्सचा हा स्मार्टफोन फक्त अॅमेझॉनवरच उपलब्ध असेल. 19 डिसेंबरपासून या फोनचं रजिस्ट्रेशन सुरु झालं आहे.
2. सायनोझेन 11 :
सायनोझेन 11 युरेका स्मार्टफोन हा वनप्लस वनशी मिळता जुळता आहे. सायनोझेन ही एक क्लाऊड सर्व्हिस आहे. युझर्सना सर्वप्रकारचा डेटा, गेम्स, लॉग-इन डिटेल, अॅप सेटिंग हे क्लाऊड सर्व्हिसवर सुरक्षित सेव्ह करण्याचा ऑप्शन देत आहे. इतकंच नाही तर तुम्ही तुमचं अकाऊंट अनेक डिव्हाईससोबत कनेक्ट करू शकता.
3. सर्वात पहिल्यांदा लॉलिपॉप अपडेट :
युरेका स्मार्टफोन्सना सर्वात पहिल्यांदा अँड्रॉईड 5.0 लॉलिपॉप अपडेट मिळेल. 8 जानेवारीला बाजारात येणारा या फोनसाठी फेब्रुवारीपर्यंत लॉलिपॉप अपडेट मिळू शकतील.
4. लेदर कवर :
या मोबाईलसोबत लेदर कवर फ्री मिळेल. यापूर्वी सॅमसंगने नोट सीरिज मोबाईलमध्ये बॅक-पॅनेलचा वापर केला होता.
5. किंमत 8 हजार 999
YU युरेका ची किंमत ही या फोनची सर्वात मोठी बाब आहे. हा पहिलाच फोन आहे, ज्यामध्ये 64-बिट ऑक्टा कोअर प्रोसेसर असूनही दहा हजारापेक्षा कमी किमतीत आहे.
तगड्या स्पर्धेत रेडमी नोटला मायक्रोमॅक्सच्या युरेकाने खूप मागे टाकलं आहे. अल्प किमतीसह सायनोझेनचं गिफ्ट देत मायक्रोमॅक्सने पुन्हा एकदा मार्केटमध्ये अस्तित्व सिद्ध केलं आहे.