स्मार्टफोनमध्ये दिवसेंदिवस नवनवे फीचर्सची भर पडत आहे. मात्र तरीही स्मार्टफोन युझर्सची सर्वात मोठ अडचण ठरते ती त्याची बॅटरी बॅकअप. फोनमध्ये अनेक अॅप एकाच वेळी सुरु असल्याने बॅटरी लवकर मान टाकते. त्यामुळे नव्या फीचर्ससह युझर्स चांगल्या बॅटरीचीही मागणी करतात.
युझर्सची ही अडचण लक्षात घेऊन लावा कंपनीने आतापर्यंत सर्वात जास्त बॅटरी पॉवर असलेला आयरिस फ्यूएल 60 लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनची बॅटरी तब्बल 4000mAh आहे.
आयरिस फ्यूएल 60चं वैशिष्ट्य म्हणजे याची बॅटरी. 3G आणि वायफायचा सलग वापर केला तरीही या फोनची बॅटरी एक पूर्ण दिवस टिकते, असा दावा कंपनीने केला आहे. दमदार बॅटरी असलेला हा फोन 25 डिसेंबर 2014 पासून बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होईल.
'स्मार्टफोन युझर्सच्या गरजा लक्षात घेऊन फ्यूएल सीरिज डिझाईन करण्यात आली आहे. बॅटरी संपण्याच्या कटकटीला वैतागलेल्या युझर्ससाठी हा स्मार्टफोन चांगला पर्याय आहे, असं कंपनीचं म्हणणं आहे
आयरिस फ्यूएल 60ची वैशिष्ट्य़े
- आयरिस फ्यूएल 60 ची स्क्रीन पाच इंचाची आहे. 720x1280 पिक्सेल फुल एचडीचा डिसप्ले आहे.
- या स्मार्टफोन अँड्रॉईड 4.4 किटकॅट ऑपरेटिंग सिस्टमला सपोर्ट करतो. तर अँड्रॉईड 5.0 लॉलीपॉपमध्ये अपग्रेडही करता येऊ शकतो.
- यामध्ये 1.3GHz क्वॉड-कोर कॉर्टेक्स ए-7 प्रोसेसर आहे.
- आयरिस फ्यूएल 60 मध्ये 1 GB रॅम आहे. त्याची इनबिल्ट मेमरी 8 GB असून जी एसडी कार्डद्वारे 32 GB पर्यंत वाढवता येऊ शकते.
- आयरिस फ्यूएल 60 मध्ये 10 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेल फ्रण्ट कॅमेरा आहे
- आयरिस फ्यूएल 60 ची किंमत 8,888 रुपये आहे.