११/२१/२०१४

'टी सीरिज'चा पहिला बजेट स्मार्टफोन बाजारात!


 भारतातील मनोरंजन क्षेत्रातील 'टी-सीरिज'नं संगीत क्षेत्रानंतर आता स्मार्टफोनच्या गर्दीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. 'टी-सीरिज मोबाईल्स'नं नुकताच आपला पहिला वहिला बजेट स्मार्टफोन लॉन्च केलाय.
चीनच्या 'शाची झिजमो लिमिटेड' या कंपनीसोबत मिळून 'टी-सीरिज'नं मोबाईल क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलंय. कंपनीच्या पहिल्या स्मार्टफोनचं नाव आहे 'एसएस ९०९'.
हा स्मार्टफोन ऑनलाईन वेबसाईटवर ५,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.  
टी-सीरीज  'एसएस ९०९'ची वैशिष्ट्ये :
* स्क्रीन : ४.५ इंच QHD डिस्प्ले
* स्क्रीन रिझोल्युशन :  ९६० X ५४० पिक्सल
* प्रोसेसर : १.३ गीगाहर्त्झ क्वॉड-कोअर प्रोसेसर
* ऑपरेटिंग सिस्टम : अँन्ड्रॉईड ४.४ किटकॅट
* रॅम  : ५१२ एमबी 
* इंटरनल मेमरी : ४ जीबी (मायक्रो एसडी कार्डच्या साहाय्याने ३२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकेल)
* रिअर कॅमेरा : ८ मेगापिक्सल, फ्लॅशसहीत
* फ्रंट कॅमेरा : २ मेगापिक्सल
* बॅटरी : १६०० मेगाहर्टझ्
* कनेक्टिव्हिटी : थ्रीजी, वाय-फाय, ब्ल्यूटूथ आणि जीपीएस
* इतर : ग्रॅव्हिटी सेन्सर, मल्टि लॅन्ग्वेज, स्पेशल व्हॉईस कमांड

-Zee 24 Tas

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search