११/२९/२०१४

किती जण भेट देतात पॉर्न साइटला, डाटा झाला उघड




 इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला असल्याचा अहवाल इंटनेट आणि मोबाईल असोशिएशनने नुकताच सादर केला आहे. यात सुमारे ३० कोटी भारतीय या वर्षाच्या अखेरीस इंटरनेट युजर्स होतील असा अंदाज व्यक्त केला आहे. या यादीत अमेरिका हा इंटरनेट वापरणारा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. 
यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यातील सर्वाधिक आणि विक्रमी इंटरनेट युजर्स हे आपला सर्वाधिक काळ हा ऑनलाइन पॉर्नोग्राफी पाहण्यात घालवितात, असेही क्वॉत्झच्या अहवालात म्हटले आहे.  पॉर्नहब या सर्वाधिक अडल्ट कनटेन्ट असलेल्या वेबसाइटवरून हा डाटा क्वॉत्झने मिळविला आहे. या माध्यमातून भारतीय इंटरनेट युजर्स किती प्रमाणात सेक्सुअल साइटला भेट देतात यावर प्रकाश टाकला आहे. 


पोर्नहब या साइटला सप्टेंबर २०१३ ते सप्टेंबर २०१४ या कालवधीत कोणी भेट दिली. त्यावरून ही माहिती गोळा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने नुकतेच इंटरनेट स्वच्छता अभियानही जाही केला आहे. त्यानुसार पॉर्न साइट बंद करण्यासाठी फिल्टर बसविण्यात येणार असल्याचे म्हटले आहे. 
भारत पॉर्न साइट पाहणारा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनणार असल्याचे क्वॉत्झने आपल्या अहवालात म्हटले आहे. यात प्रथम क्रमांक अमेरिकेचा आहे, तेथून ४० टक्के पेज व्ह्यूज मिळतात. 
ईशान्य भारत आणि दिल्ली येथून सर्वाधिक वेळ हा पॉर्न साइट पाहण्यासाठी घालविला जातो. यात अधिक पेजला भेट देणे आण एका पेजवर सर्वाधिक काळ घालविणे याचाही समावेश आहे. यात सरासरी एक भारतीय एका पॉर्न साइटवर ८ मिनिटे आणि २२ सेकंद एकावेळी खर्ची पाडतो. 

सध्या जरी सनी लिऑन हीने पॉर्न इंडस्ट्रीतून निवृत्ती घेतली आहे आणि बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. भारतातील इंटरनेट युजर्स यांच्यात पोर्ट स्टार म्हणून सनी लिऑन हिचा प्रथम क्रमांक लागतो. त्यानंतर लिसा अन आणि प्रिया राय यांचा क्रमांक लागतो. 


भारत हा स्मार्टफोनच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ आहे. त्यामुळे यातील ५० टक्के युजर्स हे पॉर्न साइटला भेट देतात. अँड्रॉइड वापरणाऱ्यामध्ये भारता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. यातील टॅबलेटवरील ट्रॅफीक फक्त २.५ टक्के आहे तर डेस्कटॉपवरून ४७.५ टक्के ट्रॉफिक पॉर्न साइटवर येते. 
भारतातील एकूण इंटरनेट व्हिजिटर्सपैकी २३ टक्के या महिला आहेत. या एकूण जागतीक युजर्सच्या केवळ २ टक्के आहेत. यातील महिलांनी सर्वाधिक सर्च हा लेसबियन आणि गे असा केला आहे.
पॉर्नहब या साइटला भारतातून शनिवारी लोक सर्वाधिक भेट देतात. तर अमेरिका, ब्रिटन, जर्मनी आणि ब्राझील येथून सोमवारी लोक सर्वाधिक भेट देतात. 
या वेबसाइटला दिवाळीमध्ये सर्वात कमी जणांनी भेट दिली. दिवाळीला ३५ टक्क्यांनी ट्राफिक कमी झाली. तर स्वातंत्र्यदिनी आणि प्रजासत्ताक दिनी ट्राफीक वाढल्याचे निदर्शनास आले. 




Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search