मनात होत खुप तुझ्याबद्दल पण ,
नाही आणता आलं कधी ओठावर...
अन् अबोल राहिलो प्रत्येक क्षण,
आणत स्मित हास्य मी गालावर...
माझ्या मनात तुझ्या भावना,
तसेच खोलवर जाऊन दाटल्या...
अन् चादंण्या रातीत जागुन,
केवळ तुझेच स्वप्न पाहिल्या....
सागरी किनार् याच्या काठावर,
एकटेपणात माझ्या मला हरवत...
अन् कातरवेळ होताच सायंकाळ,
तुझ्या विरहात मी पुन्हा मिरवत....
आता ती वेळ निघुन गेली,
तुला सारं सागुनं टाकायचं...
राहिल्या केवळ तुझ्या आठवणी,
आता त्याच आठवणीत जगायचं...
आता केवळ वेड लागलयं,
तुझ्यासाठी कविता करायची...
अन् मनातल्या भावनाना पून्हा,
नव्याने कोर् या कागदावर उतरावयची...!!