११/१८/२०१४

1 GB रॅम, HD डिस्प्लेचा 4G फोन, किंमत फक्त 4 हजार रुपये!



म्ही स्मार्टफोनचे चाहते आहात का ? तुमच्यासाठी एक नवा स्मार्टफोन बाजारात आला आहे.

1 GB रॅम आणि HD डिस्प्ले  असलेला स्मार्टफोन महाग असल्यामुळे खरेदी करु शकत नसाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्मार्टफोनच्या जगतात शाओमी धमाल उडवून देणार आहे. शाओमी आता 4G स्मार्टफोन लाँच करणार आहे आणि तो ही 3 G च्या रेंजमध्ये.

शाओमी आता Mi3 आणि Redmi 1S च्या पाठोपाठ आणखी एक स्मार्टफोनचे मॉडेल लाँच करणार आहे. एका रिपोर्टेनुसार चीनमधील आघाडीची स्मार्टफोन उत्पादक असलेली ही कंपनी आता सर्व अद्यावत फिचरसह बजेटमध्ये बसणारा स्मार्टफोन लवकरच आणणार आहे.

शाओमीचा हा स्मार्टफोन आता एलटीई सपोर्ट, 1GB रॅम आणि HD डिस्प्ले या फिचरसह अवघ्या 65 डॉलरमध्ये उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. भारतीय चलनात याची किंमत अवघी चार हजार रुपये असेल.

शाओमी ही चीनची अॅपल म्हणून ओळखली जाते आणि या कंपनीने लीडकोर नावाच्या चीपमेकर बरोबर गुंतवणूक करार केला आहे. आता शाओमी नवे स्मार्टफोनची निर्मिती लीडकोरच्या नव्या चीपसेटवर आधारीत करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.  यात 4 G एलटीई सपोर्ट, 3 जीएसएम/ एज, WCDMA, एलटीई, एफडीडी आणि टीडी-एलटीई नेटवर्क कनेक्टिव्हीटी सोबत HD डिस्प्लेचे फीचरही असेल.
-ABP Majha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search