११/२५/२०१४

नोकियाचा टॅबलेट



मोबाइल हँडसेट उद्योग मायक्रोसॉफ्टला विकल्यानंतर 'नोकिया'ने पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे. 'एन १' नावाने विक्री करण्यात येणारा हा टॅबलेट कंपनीच्या अधिकृत विंडोजऐवजी अँड्रॉइड लॉलिपॉपवर आधारीत असणार आहे. ७.९ इंचाचा हा टॅब्लेट २०१५च्या पहिल्या तिमाहीत चीनमध्ये व त्यानंतर जगभर विक्रीसाठी खुला होईल. त्याची किंमत २५० डॉलर असणार आहे. यामध्ये २ जीबी रॅम, ३२ जीबीची इंटर्नल मेमरी, ५३०० mAh बॅटरी, ५ मेगापिक्सलचा फ्रंट आणि ८ मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा आहे. 

मायक्रोसॉफ्टने नोकिया हे ब्रँडनेम हटविल्यानंतर आठवडाभरातच कंपनीने हे पाऊल उचलले. फॉक्सकॉन या तैवानी कंपनीच्या सहकार्याने नोकियाने हा टॅबलेट तयार केला आहे. 

नेक्सस ६चे बु‌किंग सुरू 

मोटोरोलाच्या नेक्सस ६ या स्मार्टफोनचे बुकींग मंगळवारपासून फ्लिपकार्टवर सुरू झाले. या फोनच्या ३२ व ६४ जीबी व्हर्जनची किंमत अनुक्रमे ४३ हजार ९९९ रु. व ४८ हजार ९९९ रु. आहे. गेल्याच महिन्यात गुगलने हा फोन जगभर सादर केला. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तो भारतात येण्याची शक्यता आहे. ५.९६ इंची डिस्प्ले, अँड्रॉइड लॉलिपॉप, १८४ ग्रॅम वजन, १३ मेगापिक्सलचा बॅक आणि २ मेगा पिक्सलचा फ्रंट कॅमेरा ही या मोबाइलची वैशिष्ट्ये आहेत.

-maharashtratimes

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search