साडेचार वर्षांनंतर वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या विविध विभागांतील २७०० पदांना नगरविकास खात्याने नुकतीच मंजुरी दिली. त्यामुळं अनेक बेरोजगारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध झालीय.
मनुष्यबळाअभावी गेल्या साडेचार वर्षांत महानगरपालिकेला विकासकामं करताना तारेवरची कसरत करावी लागली. शासनाच्या या दिरंगाईमुळं महानगरपालिकेला विकासकामं करण्यासाठी ठेकेदारांवर अवलंबून राहावं लागलं.
सध्या महानगरपालिकेत हजारो कर्मचारी ठेक्यावर काम करीत आहेत. शासनाच्या या निर्णयामुळं विकासकामाला गती मिळण्याची शक्यता आहे आणि बेरोजगारांना नोकरी.