१०/०२/२०१४

बीअरचे सेवन केल्यामुळे बुद्ध्यांक वाढतो


जास्त करून लोकांना असे वाटते की, रेड वाईन,ब्लूबेरी आणि डार्क चॉकलेट मानवाच्या मेमरीसाठी फायदेशीर आहे. हा फायदा बीअर प्यायल्यानं सुद्धा होतो. शास्त्रज्ञांनी छोट्या उंदरांवर हा प्रयोग केला होता. शास्त्रज्ञांच्यामते बीअरमध्ये आढळून येणारा जॅंथोह्युमोल नावाचा घटक हा संज्ञानात्मकची क्षमता वाढविण्यासाठी पोषक आहे.
परंतु, बीअरचा फायदा वयोवृद्ध उंदरांवर यांचा काही उपयोग होत नाही, असं ही संधोशकांनी सांगितलं.बीअरमध्ये विशेष घटक आणि रेड वाईन किंवा ब्लूबेरीमध्ये दिसून येणारा महत्त्वपूर्ण घटकांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे आहे. 
शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगातून असे दिसून आले की, वयोवृद्ध उंदरांवर याचा काही फरक पडताना दिसत नाही. पण, हा प्रयोग करताना उंदरांना बीअरचे प्रमाण जास्त देण्यात आले होते. याच अर्थ असा नाही की, बुद्ध्यांक वाढविण्यासाठी बीअरचे जास्त सेवन  करणे गरजेचे आहे. हा सर्व अभ्यास 'जर्नल बिहेविअरल ब्रेन रिसर्च'मध्ये प्रकाशित झाला आहे.

Zee 24 Tas


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search