९/२०/२०१४

मृत व्यक्तीच्या फेसबुक, ट्विटर अकाऊंटचं काय होतं?


आजच्या घडीला आपल्या सर्वांच्या आयुष्यात इंटरनेटची भूमिका मोठी आहे. चॅटिंगपासून ते खरेदीपर्यंतची सर्व महत्वपूर्ण कामं इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच इंटरनेट हा आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा घटक बनला आहे. 

इंटरनेटवर कोणत्या ना कोणत्या अकाऊंटच्या माध्यमातून आपण जोडलेलो असतो. ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या गरजा पूर्ण करत असतो. मात्र व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपण त्याच्या या इंटरनेटवरील विवध अकाऊंट्सचे  काय होते? असा प्रश्न उपस्थित होतो. 

व्यक्तीच्या मृत्यूनंतर इंटरनेटवरील त्याच्या अकाऊंट्सचा अॅक्सेस कोणालाही मिळत नाही. याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. त्यात त्याचे सर्व हक्क त्याची पत्नी, मुलगा यांना मिळायला हवेत का? की अॅटोमॅटीक त्याच्या कुटुंबीयाकडे त्याचे अधिकार जावेत असा प्रश्न उपस्थित होतो. त्याबाबत फेसबूक, ट्विटर आणि गूगल यांची 'आफ्टर डेथ पॉलिसीज़'बाबत नवी माहिती पुढे येत आहे.

इनअॅक्टीव अकाऊंट मॅनेजर

सध्या जगभरात व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाऊंट्सचे अधिकार अॅटोमॅटीक त्याच्या जवळच्या व्यक्तीकडे देण्यासंबंधीचा कायदा करण्याचा विचार सुरू आहे.
जी मेल आणि गूगल प्लस या इमेलच्या सेवा देणाऱ्या संस्था  ‘इनअॅक्टीव अकाऊंट मॅनेजर’ नावाचा एक टूल उपलब्ध करून देत आहे. त्याच्या माध्यमातून एकप्रकारे नॉमिनेशन भरून आपल्या मृत्यूनंतर अकाऊंटचे काय करावं याबाबतची माहिती देण्यात येईल.

या अॅपमध्ये तुम्ही 6 महिने किंवा एक वर्षाचा वेळ निश्चित केलात की मृत्यूनंतर आपोआप अकाऊंट डिलीट होईल. तसंच जर का तुम्ही बँक अकाऊंटप्रमाणे तुमच्या मेलचं नॉमीनेशन केले तर मृत व्यक्तीच्या ई-मेलवर येणारे सर्व मेल तुम्हाला येतात. या सर्व्हिसमध्ये तुम्ही केवळ जी मेल किंवा गूगलच्या यूजर्ससाठी ही सेवा आहे.

या लिंकवर Google Inactive Account Manager जाऊन आपण आपल्या अकाऊंटची सेटींग करू शकता.

फेसबुकचं काय?

वरील सुविधा ही जी मेल किंवा गूगल युझर्ससाठी आहे. मात्र असं असताना फेसबुक ही जगातील सर्वात मोठी ऑनलाईन सोशल नेटवर्किंगची साईट ही सेवा देत नाही. यामध्ये  आपल्या आवडीच्या व्यक्तीला केवळ मेमोराईस करण्याची विनंती करू शकता. त्यामुळे व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या अकाऊंटमध्ये कोणीही लॉग ईन करू शकणार नाही. तसंच तुमच्या अकाऊंटमध्ये कोणीही फेरफार करू शकणार नाही. 

ट्विटर

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्याशी संबंधित एकाद्या व्यक्तीने ट्विटरकडे त्याच्या मृत्यूची माहिती दिली तर, ट्विटर त्या व्यक्तीचे अकाऊंट बंद करते. त्यासाठी त्या व्यक्तीचा मृत्यू दाखला सादर करणे गरजेचे असते. कारण अनेक ट्विटर अकाऊंट हे स्वत:च्या नावाचे नसतात. 

याशिवाय कंपनी मृत व्यक्तीशी संबंधित आणखी काही माहिती मागू शकते. ही माहिती दिल्यानंतर ट्विटर त्याचे  अकाऊंट 30 दिवसात कायमचे बंद करते. तसंच अकाऊंट बंद करण्याची विनंती करणाऱ्या व्यक्तीच्या मागणीनुसार मृत व्यक्तीचे फोटोही काढून टाकले जातात. मृत व्यक्तिचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यासाठी या लिंकवर क्लिक कराhttps://support.twitter.com/articles/87894-contacting-twitter-about-a-deceased-user-or-media-concerning-a-deceased-family-member

ABP Majha

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search