८/२२/२०१४

भारतामध्ये मोटो जीची विक्री बंद होणार


जर तुम्हाला मोटोरोलाचा मोटो जी घ्यायचा असेल तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. कारण फ्लिपकार्टने मोटो जीचा शेवटचा स्टॉक मार्केटमध्ये उतरवला असून यानंतर भारतामध्ये 'मोटो जी'ची विक्री बंद होणार आहे.

फ्लिपकार्टने आपल्या वेबसाईटवर टाकलेल्या बॅनरमध्ये, 'संधी जाण्यापूर्वी बुक करा 'मोटो जी'चा शेवटचा स्टॉक' असा संदेश टाकला आहे. याआधीच 'मोटो जी'चे ८ जीबीचे मॉडेल आऊट ऑफ स्टॉक झाले असून फक्त १६ जीबीचे मॉडेल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

५ सप्टेंबरला मोटोरोला भारतामध्ये 'मोटो जी'चे पुढील व्हर्जन लॉन्च करणार असून त्यासाठी कंपनीने जोरदार तयारी सुरु केली आहे. 'मोटो जी'च्या पहिल्याच मॉडेलला भारतीयांनी भरभरुन प्रतिसाद दिल्याने मोटोरोलाने भारतीय मोबाईल बाजारपेठेमध्ये जोरदार कमबॅक केले आहे. मात्र आता नवीन प्रोडक्टसाठी जागा बनवण्याच्या दृष्टीने मोटोरोला 'मोटो जी'ची विक्री बंद करणार आहे.

महिन्याभरापासून अनेक नवीन कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्याने मोटोरोलाला तगडे आव्हन मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने आसुसचा जेनफोन फाइव्हने मोटोरोलाला पहिल्यांदा झटका दिला. त्यानंतर आलेल्या चीनच्या झीओमीच्या एमआय थ्रीने तर मोटोरोलाला शर्यतीतून बाहेरच टाकल्याने मोटोरोलाने 'मोटो जी'ची किंमत कमी केली. मात्र झीओमीची जादू कमी होत नसल्याने मोटोरोलाने नवीन फोन लॉन्च करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.


५ सप्टेंबरला ल़ॉन्च होणा-या मोटोरोलाच्या नवीन 'मोटो जी टू'चे फिचर्स खालीलप्रमाणे असण्याची चर्चा जोर धरत आहे.

७२० पिक्सल्स रेझोल्यूशनची ५ इंचाची डिस्प्ले स्क्रीन

१.२ गीगाहर्त्ज क्वॉड-कोअर कोर्टेक्स ए७ प्रोसेसर

स्नॅपड्रॅगन ४०० चिपसेट

एड्रिनो ३०५ जीपीयू

एक जीबी रॅम

८ मेगापिक्सल रेअर व्ह्यू कॅमेरा

२ मेगापिक्सल फ्रण्ट कॅमेरा

८ जीबी इंटरनल मेमरी

अॅण्ड्रॉइड किटकॅट ४.४.४ व्हर्जनची ऑपरेटिंग सिस्टीम


Maharashtra Times



Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search