ऑनलाईन शॉपिंग बेवसाईट फ्लिपकार्टने आज स्वत:चा पहिला टॅबलेट लॉन्च केला आहे. कंपनीच्या डिजीफ्लिप प्रो या ब्रॅण्ड अंतर्गत हा टॅबलेट आज भारतीय बाजारात दाखल झाला आहे.
डिजीफ्लिप प्रो XT712 असं या टॅबलेटचं नाव आहे. आयपीएस डिसप्लेयुक्त सात इंच असलेल्या या टॅबलेटची किंमत 9,999 रुपये आहे. तसंच यामध्ये फ्लॅशसह पाच मेगापिक्सेल रिअर कॅमेरा असून फ्रण्ट कॅमेरा दोन मेगापिक्सेल आहे.
काळ्या आणि पांढऱ्या रंगात हा टॅबलेट उपलब्ध आहे. डिजीफ्लिप प्रो XT712 टॅबलेटमध्ये 1.3GHz क्वॉड कोर कॉर्टेक्स ए 7 प्रोसेसर आहे. तर याचा रॅम GB आहे. टॅबलेटची इंटर्नल मेमरी 16GB असून यात अँड्रॉईड 4.2 जेलीबीन ऑपरेटिंग सिस्टम आहे.
याची बॅटरी 3000mAh आहे. डिजीफ्लिप प्रो XT712 हा 3G टॅबलेट आहे. शिवाय कंपनीने यात व्हॉईस कॉलिंगची सुविधाही दिली आहे.
टॅबलेटमध्ये काही डिफेक्ट असल्यास 30 दिवसात तो रिप्लेस करता येऊ शकतो आणि कंपनीने टॅबलेटवर एक वर्षाची वॉरंटीही दिली आहे.
या टॅबलेटसह 5000 रुपयांहून अधिक शॉपिंग बेनिफिट्स आणि 2000 रुपये किंमतीचे ई बुकही मिळणार आहेत. शिवाय एक ब्लुटूथ मोफत मिळणार असून कव्हरवर 50 टक्के डिस्काऊंट मिळेल. कंपनीचा दावा आहे की टॅबलेट खरेदीवर ग्राहकांना एकूण नऊ हजार रुपयांचा फायदा मिळणार आहे.
या टॅबलेट फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर खरेदी करता येऊ शकतो. कंपनीने देशाच्या 100 शहरांमध्ये 120 सर्व्हिस सेंटर उभारले आहेत. दिल्ली, मुंबई, बंगलोर, कोलकाता, हैदराबाद आणि चेन्नईसह 13 शहरांमध्ये ग्राहकांना 22 सेंटरवर फ्लिपकार्टची 24 तास सेवा मिळू शकणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा