६/२८/२०१४

'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ

'वोडाफोन' ग्राहकांना जबर धक्का.. इंटरनेट दरांत वाढ

वोडाफोन इंडियानं देशभरात आपल्या टूजी आणि थ्रीजी ग्राहकांना चांगलाच धक्का दिलाय. वोडाफोनचे इंटरनेट दर तब्बल दुप्पटी पेक्षा जास्त दरानं वाढवण्यात आलेत. 
प्रीपेड आणि पोस्ट पेड ग्राहकांसाठी ‘पे एज यू गो’ (PAYG) 4 पैसे प्रति 10 केबी राहील. यापूर्वी 10 केबी साठी कंपनी 2 पैसे इतका दर आकारत होती. कंपनीनं नोव्हेंबर 2013 मध्येच दरांमध्ये 80 टक्के कपात करून 2 पैसे प्रति 10 केबी असा दर लागू केला होता. वोडाफोनचे हे नवीन दर झोनप्रमाणे टप्प्याटप्प्यानं हे नवीन दर लागू करण्यात येणार आहेत.  
कंपनीच्या प्रवक्त्यांना याबाबत विचारणा केल्यानंतर, वोडाफोननं PAYG ग्राहकांसाठी मोबाईल इंटरनेट दरांत काही बदल केले आहेत. हे बदल लवकरच सगळ्या सर्कल्समध्ये लागू होणार आहेत, असं म्हणत या बातमीला दुजोरा दिलाय. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search