६/१९/२०१४

अंदाज अपना अपना`चा सिक्वेल येणार?

`अंदाज अपना अपना`चा सिक्वेल येणार?

दिग्दर्शक राजकुमार संतोषी `अंदाज अपना अपना`चा सिक्वेल काढणार असल्याचं समजतंय. मात्र त्यांना सिक्वेलसाठी सलमान आणि आमिर अभिनेता तसंच निर्माते म्हणून देखील हवे आहेत. 

1994ला प्रदर्शित झालेला `अंदाज अपना अपना`नं बॉक्स ऑफिसवर जास्त कमाई केली नसली तरी, त्या चित्रपटातील विनोद, ड्रामा, गाणी, मनोरंजनामुळे तो चांगलाच लक्षात येतो. 

चित्रपटाबद्दल सलमान आणि आमिरला विचारल्यास, आता त्यांना चित्रपटाचा सिक्वेल करणं शक्य नाहीय त्यावेळी गोष्ट वेगळी होती आता ते बॉलिवूडचे बिग स्टार झाले आहेत. 

दोघे ही बॉलिवूडचे बिग स्टार असल्याने दोघांना एकत्र साईन करणं कठीण आहे. तसंच जर दोघे चित्रपटाच्या निर्मितीसाठी तयार असतील तर सिक्वेल करता येईल, असं संतोषी म्हणाले.

जर चित्रपटाची स्क्रिप्ट आवडली तर त्यावर ते विचार करणार आहेत. त्यासाठी स्क्रिप्ट तगडी असणे महत्त्वाचं आहे. त्यांना स्क्रिप्टही चांगली आणि विनोदी हवी असल्यानं सध्या बॉल इज इन माय कोर्ट, असंही राजकुमार संतोषी म्हणाले.

त्यामुळे आता स्क्रिप्टवर काम करत आहे, असं `चारफुतिया छोकरे` चित्रपटाच्या फर्स्ट लुकचं लॉन्च करताना राजकुमार यांनी सांगितले.


शिवाय दोन मुद्दे समोर ठेवून स्क्रिप्टचं काम ते करत आहे. ज्यात एक म्हणजे सलमान आणि आमिरसोबत एका नव्या चेहऱ्याला आणण्याच्या प्रयत्न आहे आणि दुसरे म्हणजे सलमान आणि आमिरच्या वयानुसार ते पात्र कसं रंगवता येईल. त्यामुळं आता बघू शेवटी काय होतं आणि आपल्याला पुन्हा धम्माल `अंदाज अपना अपना` पुन्हा पाहायला मिळतो का ते?

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search