६/१६/२०१४

हजारोंचा बळी घेणाऱ्या केदारनाथच्या महाप्रलयाची वर्षपूर्ती


केदारनाथच्या महाप्रलयाला आज एक वर्षं पूर्ण झालं आहे. एक वर्षांपूर्वी केदारनाथमध्ये आलेल्या महाप्रलयात हजारो लोकांचा बळी गेला. अनेक जण जखमी झाले. हजारो बेपत्ता आणि लाखो लोक बेघर झाले.

अनेक जण आपल्या लोकांच्या शोधासाठी आजही केदारनाथामध्ये तळ ठोकून आहेत. केदारनाथाच्या मंदिरासमोर होमहवन सुरु आहे. मृतांना श्रद्धांजली वाहिली जात आहे आणि बेपत्ता भाविकांच्या शोधासाठी प्रार्थना, होम हवन सुरु आहे.

गेल्या वर्षभरात बेपत्ता भाविकांची शोधमोहीम, तुटलेले रस्ते दुरुस्त करणं, केदारनाथाला सावरणं सुरु होतं. दोन महिन्यापूर्वी केदारनाथाचे रस्ते सुरु झाल्यानंतर चारधाम यात्रेला पुन्हा सुरुवात झाली होती. पण या यात्रेवरही प्रलयाचं सावट कायम आहे.

आज या प्रलयाला एक वर्ष पूर्ण होत आहे. पण या महाप्रलयाने झालेल्या विध्वंसाच्या जखमा परिसरातही दिसतात आणि लोकांच्या मनातही.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search