वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आज दोन महत्वाचे प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहेत. 2.80 किलोमीटर लांबीचा ईस्टर्न फ्री वेचा पुढचा टप्पा आणि वेस्टर्न एक्सप्रेस हायवेरील खेरवाडी जंक्शनवरील उड्डाणपूल आज वाहतुकीसाठी खुला होत आहे.
या दोन्ही प्रकल्पांचं आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. खेरवाडी उड्डाणपुलाचं दुपारी तीन वाजता तर घाटकोपर-पांजरपोळचा उड्डाणपूल साडे तीनच्या सुमारास उद्घाटन सोहळा पार पडेल.
गेल्या वर्षी ईस्टर्न फ्री वेचा दक्षिण मुंबई ते पांजरपोळ या पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला झाला होता. तर आज पांजरपोळ ते घाटकोपर हा पुढचा टप्पा वाहतुकीसाठी खुला होत आहे. त्यामुळे फोर्ट ते घाटकोपर अवघ्या अर्ध्या तासात पोहचता येणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा