६/१६/२०१४

`एसबीआय`मध्ये ७२०० पदांसाठी होणार भरती


देशातली सगळ्यात मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ इंडियानं मोठ्या प्रमाणात भरती होणार 
आहे. यंदा, बँकेचा स्टाफ मोठ्या संख्येत सेवानिवृत्त होत असल्यानं मोठ्या प्रमाणात नवीन स्टाफ भरती करण्याची बँकेला गरज पडणार आहे. 

एका इंग्रजी दैनिकानं दिलेल्या बातमीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया या आर्थिक वर्षात ७२०० लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. बँकेचे एकूण ८१०० कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार आहेत. बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता बँकेचा भर असेल तो मोठ्या प्रमाणात नवीन टेक्नॉलॉजी वापरण्यावर आणि त्याचा ग्राहकांना फायदा उपलब्ध करून देण्यावर... 

सध्या, अशा कर्मचाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे ज्यासाठी फार शिक्षणाची आवश्यकता नाही, असंही त्यांनी म्हटलंय. यासाठी बँकेनं नवीन मशीन्सही वापरण्याच्या तयारीत आहे. 

‘मॅकिन्स्की इंडिया’नं दिलेल्या माहितीनसार, २०२० पर्यंत या बँकेचे ७५ टक्के वरिष्ठ मॅनेजर सेवानिवृत्त होतील. स्टेट बँक ऑफ इंडियाचे डीएमडी जे. एन. मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, आर्थिक वर्ष २०१४-१५ मध्ये बँक १८३७ पीओ आणि ५४०० असिस्टंट ऑफिसर पदांवरदेखील भरती जाहीर करू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search