६/२५/२०१४

दोन वर्षापासून मी सिंगल आहे- आलिया

दोन वर्षापासून मी सिंगल आहे- आलिया


सध्याची टॉप टेनच्या लिस्टमध्ये असणारी आलिया भट्टचे नाव तिच्या सोबतकाम करणाऱ्या अभिनेत्यासोबत घेतले जात असते. मात्र या गोष्टीला आलियाने नकार देऊन, 'मी गेल्या दोन वर्षापासून सिंगल आहे' असल्याचं तिने सांगितलंय. 
आलियाचा आगामी चित्रपट 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'च्या प्रमोशनच्या वेळी बोलताना आलियाने, 'माझ्या चाहत्यांनी निराश होण्याची गरज नाही, कारण मी दोन वर्षापासून सिंगल आहे. मी केव्हापासून सांगतेय की माझ्या डेंटिगच्या बातम्या खोट्या आहेत. पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाही.' 
 
आलियाने 'स्टूडन्ट ऑफ द इयर'मधून बॉलिवूडच्या अभिनेत्रीमध्ये पहिले पाऊल ठेवले. यावर्षी आलेल्या 'हाईवे' आणि 'टू स्टेटस' चित्रपटात आलिया आपल्याला वेगवेगळ्या भूमिकेत दिसली.
 
'मला आता एका विनोदी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे', असही आलियाने आपली इच्छा सांगितले. सध्या सोशल मिडीयात आलियाच्या जनरल नॉलेजवरुन खूप थट्टा सुरु आहेत.
सोशल मिडीयाच्या तिच्या बद्दल सुरु असलेल्या थट्टेवरुन विचारल्यास तिनं सागितले की, 'माझ्याविषयीचे विनोद वाचून मला जराही दुःख होत नाही' उलट ते वाचून माझे चांगलेच मनोरंजन होते कारण, ते विनोद मला मजेशीर वाटतात.' 
'स्टूडन्ट ऑफ द इय'र फेम वरुण धवन आणि आलिया भट्ट ही जोडी 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया' पुन्हा चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. येत्या 11 जुलैला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search