६/१९/२०१४

फेसबुक अचानक १५ मिनिटं बंद

View image on Twitter

सोशल नेटवर्कींग सेवा देणारं फेसबुक दुपारी अचानक कोसळलं आणि बंद पडलं. त्यामुळे फेसबुक यंत्रणेबरोबरच युजर्स काही काळ गोंधळत पडले. १५ मिनिटांच्या गोंधळानंतर फेसबुकचा अॅक्ससेस मिळाला आणि युजर्सचा जीव भांड्यात पडला. या काळात फेसबुकच्या होमपेज आणि इतर पेजेसवरही Sorry, something went wrong. असा मसेज येत होता. याच काळात फेसबुक मोबाइलवर आणि इतर संबंधित अॅप्स् (अॅन्ड्रॉइड आणि ब्लॅकबेरी) वरही सुरु होत नव्हतं. तिथेही तोच मॅसेज झळकत होता.

फेसबुकच्या या गोंधळानंतर ते सुरू झाल्यावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस पडला. किमान १५ मिनिटं फेसबुक बंद पडल्यानं युजर्सनी नाराजी व्यक्त केली. अमेरिका, ब्रिटन आणि आशियातील अनेकांनी फेसबुक बंद पडल्याची तक्रार ट्विटरवर नोंदवली.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search