रणबीर आणि कटरीनाच्या प्रेमसंबंधांची चर्चा गेल्या वर्षाभरापासून होत आहे. त्यात आणखी भर पडताना दिसत आहे. कारण रणबीर आणि कटरीना आता एकत्र राहणार असल्याची चर्चा आहे. नुकताच त्यांनी मुंबईत एक फ्लॅट खरेदी केला असल्याचं कळतं आहे.
मुंबईच्या डेली मीड-डे या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लवबर्ड रणबीर आणि कटरीना कैफने वांद्रा येथील कार्टर रोडवर एक फ्लॅट खरेदी केला आहे. आणि लवकरच ते एकत्र राहणार आहेत.
मागील वर्षी रणबीर आणि कटरीना एका परदेशात सुट्टीसाठी गेले होते. त्यानंतर एका फिल्मी मासिकाने कटरीनाचे बीकनीवरचे छायाचित्र मुखपृष्ठावर छापले होते. त्यामुळे त्यांच्या संबंधांची जोरदार चर्चा सुरू झाली.
रणबीर आणि कटरीनाने दक्षिण अफ्रिकेतही घर खरेदी केले आहे. आणि त्या घराच्या सजावटीसाठी त्यांनी अनेक वस्तूंची खरेदीही केली असल्याचा दावा डेली मिड-डे या वृत्तपत्राने केला आहे.
यासोबतच दक्षिण अफ्रिकेत हे दोघे एकातांत राहिले होते. एकांतवासात राहिल्याने ते दोघे खूप आनंदी होते.
टिप्पणी पोस्ट करा