६/२१/२०१४

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला

Photo: http://bit.ly/1kViRDv

निवडणुकीपूर्वी नाशकात राज ठाकरे लागले कामाला... काय म्हणाले राज ठाकरे... 
http://bit.ly/1kViRDv


विधानसभा निवडणुकीत मतदारांकडे मतं मागताना नाशिक मॉडेलचे दाखले देण्याची रणनीती मनसे आखतंय. त्यासाठीच नाशिकमध्ये मनसे झपाटून कामाला लागलीय. राज ठाकरे स्वतः नाशिकवर लक्ष ठेवून आहेत.

राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वतः मनसे अध्यक्ष लवाजम्या सह नाशिकमध्ये आले होते. लोकसभा निवडणुकीच्या पराभवातून सावरत मनसे आता झपाटून कामाला लागलीय. त्यामुळंच फक्त आठ दिवसांत दुसऱ्यांदा राज ठाकरेंचे पाय नाशिकला लागले. 

गोदापार्क प्रकल्पाचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचा आणि उर्वरित टप्पे येत्या तीन वर्षात पूर्ण करण्याचा विश्वास राज ठाकरेंनी अनौपचारिक गप्पांमध्ये व्यक्त केला. त्याचबरोबर नाशिक शहर वायफाय सिटी करण्याचं आणि नाशिकमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी ट्रामच्या पर्यायाचा विचार सुरु असल्याचं सुतोवाच करून नाशिकरांना नवी स्वप्नं दाखवली.

गोदापार्क प्रकल्पासारखीच नाशिक शहरातली इतर उद्यानं बांधकाम व्यावसायिकांच्या माध्यमातून विकसित करण्याचा मनसेचा विचार आहे. त्यामुळं विरोधकांनी आतापासूनच तलवारींना धार काढायला सुरुवात केलीय. 

महापालिकेची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळं मनपाच्या माध्यमातून मोठे प्रकल्प राबवणं शक्य नसल्याचं मनसेकडून वारंवार सांगितलं जातंय आणि खाजगी करणासाठी पोषक वातवरण तयार केलं जातंय. सगळीच कामं खाजगीकरणाच्या माध्यमातून करायची, तर मनसे काय करणार? ब्ल्यू प्रिंट गेली कुठे असा खोचक सवाल विरोधक करतायेत.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search