मुंबईत मेट्रो सुरू झाल्यापासून मेट्रो प्रशासन प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या आहे. आता यामध्ये आणखी एका ऑफरची भर पडताना दिसत आहे. कारण पहाटे 5.30 ते 8 या वेऴेत कोणत्याही दोन स्टेशन्सदरम्यानचा प्रवास केवळ पाच रूपयांमध्ये करता येणार आहे.
कारण सकाळी 5.30 ते 8 या कमी गर्दीच्या वेळी मेट्रोनं प्रवास करणाऱ्यांना आता केवळ 5 रूपये भरावे लागणार आहेत. मेट्रो प्रशासनाच्यावतीनं आज ही घोषणा करण्यात आली.
मेट्रोच्या तिकीटाचा दर 10 रूपये असला तरी कमी गर्दीच्या काळात प्रवास करण्यास प्राधान्य देण्यासाठी हा दर 5 रूपये इतका कमी करण्यात आला आहे. ही योजना प्रायोगिक तत्वावर आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्याभरासाठी मुंबईकरांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला तर उपक्रम कायमस्वरूपी सुरू ठेवण्याबाबत विचार केला जाईल असंही प्रशासनानं सांगितलं आहे. तिकीट काढणाऱ्यासोबतच स्मार्टकार्डधारकांनांही ही योजना लागू असणार आहे.
गुरूवारपासून म्हणजेच उद्यापासून या उपक्रमाची अंलबजावणी होणार आहे. अशा प्रकारचा उपक्रम सर्वात आधी इंग्लंडने सुरू केला होता. त्यानंतर इतर देशांनी तो राबवला. आता मुंबई मेट्रोनी हा उपक्रम राबवल्याने मुंबईतील चाकरमान्यांसाठी आता मुंबई मेट्रोतर्फे आणखी एक भेट मिळाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा