६/१०/२०१४

‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!

<B> <font color=red> खुशखबर :</font></b>  ‘बँक ऑफ इंडिया’त 4500 जणांची भरती!

‘बीओआय’ अर्थातच बँक ऑफ इंडियानं आर्थिक वर्ष 2014-15 साठी 4500 जागांसाठी भरती जाहीर केलीय. यापैंकी 2000 पद अधिकारी वर्गातील तर उरलेल्या 2500 जागा क्लार्क आणि इतर कर्मचारी वर्गातील भरती होणार आहे. 

बँकेचे अध्यक्ष तसंच प्रबंध निर्देशक व्ही. आर. अय्यर यांच्या म्हणण्यानुसार बँकेने 31 मार्च 2014 पर्यंत एकूण 8 लाख 53 हजार करोड रुपयांचा व्यवहार केलाय. बँकेची एकूण जमा 4 लाख 77 हजार करोड रुपये आहे. तसंच बँकेनं 3 लाख 76 हजार करोडोंचं कर्जवाटप केलंय. 

अय्यार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या 4628 शाखा कार्यरत आहेत आणि मार्च 2015 पर्यंत बँकेंच्या आणखीन 500 नव्या शाखा उघडण्याचा मानस आहे. सोबतच, सध्या देशात कार्यरत असलेल्या 4665 एटीएमची संख्या वाढवत 8000 पर्यंत नेण्यात येईल. 

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search