५/२५/२०१४

दिवस मेगाब्लॉकचा!


*कुठे- विद्याविहार ते भायखळा अप धिम्या मार्गावर
*कधी- रविवार, २५ मे २०१४  सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५
*परिणाम- सकाळी १०.५४ ते दुपारी ३.११ वाजेपर्यंत सर्व उपनगरी गाडय़ा कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ या स्थानकांवर थांबणार आहेत. भायखळा स्थानकानंतर गाडय़ा धिम्या मार्गावर वळविण्यात येतील.
छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.०८ ते दुपारी २.४० या वेळेत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड येथे थांबणार आहेत.
तर ठाण्याहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जाणाऱ्या अप जलद मार्गावरील गाडय़ा सकाळी १०.५० ते दुपारी ३.३६ या वेळेत मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला या स्थानकांवर थांबणार आहेत. अप धिम्या मार्गावर विद्याविहार, करीरोड आणि चिंचपोकळी रेल्वे स्थानकांवर या कालावधीत गाडय़ा थांबणार नाहीत. येथे जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांना डाऊन दिशेसाठी व्हाया कुर्ला आणि भायखळा येथपर्यंत प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.   
*कुठे- पनवेल ते नेरुळ अप आणि डाऊन हार्बर मार्ग
*कधी- रविवार, २५ मे २०१४, सकाळी ११ ते दुपारी ३
*परिणाम- सकाळी १०.४३ ते दुपारी ३.२७ या वेळेत अप मार्गावर पनवेल ते नेरुळ मार्गावरील वाहतूक रद्द करण्यात आली आहे. तर डाऊन मार्गावर नेरुळ ते पनवेल या मार्गावरील वाहतूक सकाळी १०.४१ ते दुपारी ३.१७ या वेळेत रद्द करण्यात आली आहे. पनवेल ते ठाणे या अप मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.१९ या वेळेत पनवेल ते नेरुळ या मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. तर ठाणे ते पनवले या डाऊन मार्गावर सकाळी ११.४२ ते दुपारी २.४८ या वेळेत नेरुळ ते पनवेल दरम्यानची सेवा रद्द करण्यात आली आहे. या काळात पनवेल ते अंधेरी हे वाहतूकही रद्द करण्यात आली आहे. या कालावधीत छत्रपती शिवाजी टर्मिनस ते ते नेरुळ आणि ठाणे-नेरुळ दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.
*कुठे- बोरिवली ते भाईंदर रेल्वे स्थानकादरम्यान अप आणि धिम्या मार्गावर
*कधी- सोमवार २६ मे च्या मध्यरात्री १.०५ वाजल्यापासून मंगळवार (२७ मे)च्या पहाटे ४.०५ वाजेपर्यंत.
*परिणाम- नालासोपारा/विरार येथून सुटणाऱ्या सर्व अप धिम्या गाडय़ा वसई रोड ते बोरिवली रेल्वे स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत. तर डाऊन दिशेच्या काही गाडय़ा गोरेगाव-वसई रेल्वे स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावरून चालविण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search