५/०४/२०१४

दिवा-सावंतवाडी पॅसेंजर अपघात


दिवा-सावंवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांचा आकडा 12 वर गेल्याचं सांगण्यात येतंय. 

प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन 02352- 228176 / 228951 / 228954 

पन्नासपेक्षा अधिक जण या अपघातात जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. अडकलेल्या प्रवाशांना इच्छीत स्थळ गाठता यावं, म्हणून 10 एसटी बस सोडण्यात आल्या आहेत.

मागोठाण्याजवळ भिसेखिंडीत रेल्वे इंजीन आणि चार डबे घसरल्याचं सांगण्यात येतंय.

प्रवाशांना स्थानिकांकडून मोठ्या प्रमाणावर सुरूवातीला मदत मिळाली, प्रशासनानेही आता युद्ध पातळीवर मतदान सुरू केलं आहे.

मंगला, मांडवी, नेत्रावती एक्स्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला आहे. या गाड्या पनवेल - पुणे मार्गे वळवण्यात आल्याच सांगण्यात येतंय.

जखमींना 15 तर मृतांच्या नातेवाईकांना 50 हजारांची प्राथमिक मदत देण्यात आली आहे.

 झी २४ तास

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search