५/२५/२०१४

येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!

 येवल्याची पैठणी आता वर्ल्ड हेरिटेज आयकॉन!

पश्चिम घाटाला `वर्ल्ड हेरिटेज साइट`चा दर्जा मिळाल्यापाठोपाठ आता नाशिकमधील येवला आणि औरंगाबादेतील पैठणमध्ये तयार होणाऱ्या पैठण्याही वर्ल्ड हेरिटेज आयकॉनच्या स्पर्धेत उतरल्या आहेत. 

युनेस्कोने भारतातील ४८ `प्रस्तावित जागतिक वारसा स्थळांची यादी` नुकतीच प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये पैठणीसाठी ओळखल्या जाणाऱ्या येवला आणि पैठणला स्थान मिळाले आहे.

जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळविण्यासाठी भारत सरकारने `युनेस्को`ला ३३ ठिकाणांचे प्रस्ताव पाठविले होते. विशेष म्हणजे या प्रस्तावांशिवाय `युनेस्को`ने स्वतः अजून १५ ठिकाणे निवडली असून एकूण ४८ प्रस्तावित स्थळांची यादी जाहीर केली आहे. 

जागतिक वारसा दिनाच्या निमित्ताने `युनेस्को`ने भारताला ही विशेष भेटच दिली आहे! या ठिकाणांमध्ये `आयकॉनिक सारी व्हेविंग क्लस्टर्स`लाही नामांकन असून, यात वैशिष्ट्यपूर्ण कारागिरीची पारंपरिक जपलेल्या साड्यांच्या आठ शहरांचा समावेश आहे. त्यात येवला आणि पैठणही आवर्जून समावेश आहे.

झी मीडिया, येवला

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search