४/२२/२०१४

तूमचं नाव मतदार यादीत आहे?



मुंबईकरांनो मतदार यादीत तुमचं नाव आहे का? हे तुम्हाला ऑफिसमधून बसूनच पाहता येणार आहे. 

मतदार यादीत तुमचं नाव आहे किंवा नाही, याची खातरजमा करणे महत्वाचे आहे. 

कारण अनेक मतदारांची नावं मतदार यादीतून गायब झाल्याच्या घटना समोर येत आहेत. 

मात्र मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही हे तपासून पाहणे, हे आपलं काम आहे.

मतदार यादीत नाव पाहण्यासाठी काही सूचना

1) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जा www.eci.nic.in 
अथवा
मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र https://ceo.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा

2) मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र यांच्या वेबसाईटवर आपला जिल्हा सिलेक्ट करा 
3) Assembly Name तुमचा मतदारसंघ, 
4) Elector SurName तुमचं आडनाव, 
5) Elector Name – तुमचे नाव, 
6) Father / Husband Name – तुमच्या वडिलांचं / पतीचं नाव 
यानंतर खाली एक कोड दिसेल, 
7) तो टाईप करून सर्च हा ऑप्शन निवडल्यावर नाव सर्च होईल.

8) तुमचं नावाचं स्पेलिंग चुकीचं असल्यास ते सर्चमध्ये दिसत नाही, म्हणून आपण आपल्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जाऊन प्रत्यक्ष मतदार यादी पाहून आपल्या नावाची खातरजमा करा.

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search