४/२६/२०१४

लोच्या झाला, राज्यात 4 ठिकाणी उद्या फेरमतदान



26 एप्रिल : मुंबईत 24 एप्रिलला झालेल्या मतदानाच्या दिवशी निवडणूक कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा फेरमतदानाची नामुष्की ओढावली आहे. महाराष्ट्रात चार ठिकाणी उद्या रविवारी म्हणजे 27 एप्रिलला फेरमतदान होणार आहे. उद्या सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत फेरमतदान होणार आहे. राज्यात एकूण 4 अशा पोलिंग बूथवर हे फेरमतदान होणार आहे.
यासंबंधी निवडणूक आयोगाने तसे आदेशही दिले आहे. प्रशिक्षणादरम्यानचा डेटा न काढल्याने फेरमतदानाचा निर्णय घेण्यात आला आहे. मतदानाआधी ईव्हीएम मशीनमध्ये टेस्ट वोट करण्यात आले होते पण हा डेटा काढणं गरजेचं असतं.
मात्र निवडणूक कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मतदान सुरू होण्या आधीही हा डेटा मशिनमध्येच होता. त्यामुळे झालेल्या मतदानापेक्षा मतदानाचा टक्का वाढल्याचं लक्षात आलं, त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. मतदारयादीत घोळामुळे मतदानाच्या दिवशी लाखो मुंबईकरांची नावं मतदारयादीतून वगळण्यात आल्यामुळे मतदानापासून वंचित राहावे लागले होते. त्यातच आता निवडणूक कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मतदानांना पुन्हा एकदा मतदान करण्याची वेळ आली आहे.
या ठिकाणी होणार फेरमतदान
उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ
चांदिवली – बूथ नंबर 160
(रुम नं.18, हिंदी बाल विद्यामंदिर स्कूल, असल्फा व्हिलेज, चांदिवली)
उत्तर मुंबई मतदारसंघ
मालाड-पश्चिम – बूथ नंबर 242
(रुम नं.1, कला विद्यालय कॉलेज, म्हाडा कॉलनी, मालवणी, मालाड-पश्चिम)
उत्तर मुंबई मतदारसंघ
चारकोप – बूथ नंबर 243
(रुम नं.2, टी.टी. भाटिया कॉलेज, शांतीलाल मोदी रोड, कांदिवली-पश्चिम)
दक्षिण अहमदनगर मतदारसंघ
हिरडगाव – बूथ क्र.305 वर फेरमतदान

IBN LOKMAT

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search