१२/१०/२०१४

गुगलचा आजपासून सर्वात मोठा शॉपिंग फेस्टिवल

 गुगल इंडियाने आजपासून ७२ हर्सऑफक्रेझी म्हणजेच, सर्वात मोठ्या ऑनलाईन खरेदी-विक्री महोत्सवास सुरवात केली आहे.
 गुगलच्या ग्रेट ऑनलाइन शॉपिंग फेस्‍टीवल (जीओएसएफ) खरेदी महोत्सवात विविध वस्तूंच्या खरेदीवर आकर्षक सूट देण्यात आल्या आहेत. खरेदी महोत्सव 10 ते 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
गुगल इंडियाकडून संकेतस्थळावर मिळणार्‍या चारशेहून अधिक वस्तूंवर आकर्षक सूट देण्यात आली आहे. जीओएसएफच्या संकेतस्थळावर अनेक नवीन वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत.  
यात सर्वात प्रथम गुगलच्या नेक्सस-वन स्मार्टफोनचा समावेश आहे. जीओएसएफच्या बरोबरीने ऐशि‍यन पेंट, जेट एयरवेज, किंडल, माइक्रोमैक्‍स,  एचपी, बिग बजार, लैक्‍मे और लिनोवो यांच्या सारख्या कंपन्यांनी आकर्षक सूट दिल्या आहेत. 
या ऑफरअंतर्गत 14 मिनिटात ग्राहकांना अडीच लाख रुपयांपर्यंत विनामूल्य खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
गुगलच्या संकेतस्थळावर "299 कॉर्नर" नावाने एक विभाग करण्यात आला आहे. त्यात  299 रुपयात सर्व उत्पादने मिळणार आहेत. विशेष बाब म्हणजे या उत्पादनांची विनामूल्य शिपिंग करण्यात येणार आहे. 
संकेतस्थळ प्रामुख्याने पाच विभागांमध्ये विभागले आहे. यात होम आणि किचन इलेक्ट्रॉनिक्स, एक्‍सक्‍लूसिव आयटम्स, विमेन्स लाईफस्टाईल, इलेक्ट्रॉनिक्स, मेन्‍स लाईफस्टाईलचा समावेश आहे.
जीओएसएफसाठी आदित्य बिर्लाच्या ‘‘माय युनिव्हर्स‘‘ सोबत 72 तासासाठी भागीदारी केली आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरेदी महोत्सवाला जास्त प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. 2012 साली महोत्सवाला 20 लाख लोकांनी प्रतिसाद दिला होता. यावर्षी पाच पट अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 
जीओएसएफयासाठी आदित्य बिर्लाच्या ‘‘माय युनिव्हर्स‘‘ सोबत 72 तासासाठी भागीदारी केली आहे.  गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी खरेदी महोत्सवाला जास्त प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. 2012 साली महोत्सवाला 20 लाख लोकांनी प्रतिसाद दिला होता. 
यावर्षी पाच पट अधिक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर यावर्षी अनेक कंपन्यांनी जीओएसएफसोबत भागीदारी केली आहे. स्‍नॅप‍डील, इबे आणि मिंत्रा.कॉम यांचा समावेश आहे.


check out the best deal on below links


Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search