११/२५/२०१४

जेव्हा अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून खेळला सचिन!




भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनं आपल्या करिअरमध्ये अनेक चढउतार पाहिलेत. एकदा पोट खराब असल्याकारणानं सचिन अंडरविअरमध्ये टिशूपेपर लावून मैदानात उतरला होता. २००३मध्ये वर्ल्डकपच्या सुपर-६ अंतर्गत १० मार्च २००३ला श्रीलंकेविरोधात जोहान्सबर्गच्या वाँडर्स मैदानात खेळल्या गेलेल्या मॅचमध्ये सचिननं हे केलं होतं. 
सचिननं आपली आत्मकथा, ‘प्लेइंग इज माय वे’मध्ये हे सांगितलं, “हे एक व्यक्तिगत गुपित आहे, जे सांगतांना मला थोडी लाजही वाटतेय. श्रीलंकेविरोधात मॅचच्या एक दिवसापूर्वी माझं पोट खराब झालं होतं. कदाचित त्यापूर्वी पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये आलेल्या क्रॅम्पमधून मी बाहेर पडू शकलो नव्हतो, म्हणून हे झालं असेल.”
श्रीलंकेविरोधात मॅच खेळण्याच्या नऊ दिवसांपूर्वी सचिनं पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये दमदार बॅटिंग करत ९८ रन्स केले होते आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरला होता. सचिनच्या म्हणण्यानुसार, “मी आपल्या ड्रिंक्समध्ये वेगळं मीठ घेतलं होतं. त्यानं पोट आणखीच बिघडलं, परिस्थिती एवढी बिघडली की मला आपल्या अंडरविअरमध्ये टिशू पेपर ठेवून मैदानात उतरावं लागलं. यादरम्यान, ड्रिंक्स ब्रेकमध्ये मी पुन्हा थोड्यावेळासाठी ड्रेसिंग रूममध्ये गेलो, त्यादिवशी मला खूप अस्वस्थ वाटत होतं.”
श्रीलंकेसोबत त्याच मॅचमध्ये सचिननं १२० बॉल्समध्ये ९७ रन्सची खेळी खेळली. ज्यामुळं भारतानं ही मॅच १८३ रन्सनी जिंकली. 






Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search