१०/२२/२०१४

लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त



सायंकाळी ६.०९ ते रात्री ८.३९ पर्यंत

दिवाळीतील लक्ष्मीपूजन गुरुवार २३ ऑक्टोबर रोजी येत असून या दिवशी सायंकाळी ६.०९ ते रात्री ८.३९ या वेळेत लक्ष्मीपूजन करावे, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. 'नरक चतुर्दशी', बुधवार २२ ऑक्टोबर रोजी असून या दिवशी चंद्रोदयापासून (पहाटे ५.०१) ते सूर्योदयापर्यंत (सकाळी ६.३६) अभ्यंगस्नान करावे. २४ ऑक्टोबर रोजी विक्रम संवत २०७१ तसेच महावीर जैन संवत २५४१ ला प्रारंभ होत आहे. या दिवशी सकाळी ६.३० ते १०.५५, दुपारी १२.२१ ते १.४७ आणि सायंकाळी ४.३९ ते ६.०९ शुभ चौघडी असल्याने व्यापारी मंडळींनी वहीपूजन आणि लेखन करावे, अशी माहितीही या पत्रकात दिली आहे. पुढील वर्षी अधिक आषाढ महिना येत असल्याने दिवाळी वीस दिवस उशिरा येत आहे. पुढील वर्षी दिवाळी १० नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search