१०/२५/२०१४

पाच कोटींना विकला गेला अॅपलचा कंप्युटर


आज अॅपलच्या प्रो़डक्ट्सबद्दल जगभरामध्ये क्रेज आहे. मात्र जेव्हा अॅपल स्थापन झालेली त्यावेळी लोकांना तंत्रज्ञान आपल्या हाताशी खेळेल याची जाणीवही नसल्याने अॅपलला आपले नाव कमवण्यासाठी संघर्ष करावा लागला. पण आज आपल्याला स्टोअर्सबाहेर ग्राहकांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळेच १९७६ साली अॅपल निर्मित पहिल्या वहिल्या अॅपल वन या कंप्युटरला अमेरिकेत झालेल्या लिलावामध्ये चक्क ५ कोटी ५३ लाख रुपयांची किंमत मिळाली आहे. 

अॅपलच्या स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव वॉजनियाक यांनी १९७६ साली अॅपलच्या ब्रॅण्डखाली अॅपल वन हे कंप्युटर बनवले होते. जॉब्सच्या पॅरट्स येथील गॅरेजमध्येच या दोघांना हे कंप्युटर बनवले होते. अॅपल वनचे फक्त ५० कंप्युटर तयार करण्यात आले होते. त्यापैकीच एका चालू स्थितीतील कंप्युटरचा नुकताच लिलाव करण्यात आला. या लिलावामध्ये कंप्युटरला अपेक्षेपेक्षा जास्त म्हणजे ५ कोटी ५३ लाख रुपयांची किंमत मिळाली. या कंप्युटरला एक कोटी ८३ लाख ते ३ कोटी पर्यंत किंमत मिळेल, अशी शक्यता लिलाव आयोजित करणा-या बानम्स या कंपनीने व्यक्त केली होती. 

मिशिगन येथील हेनरी फोर्ड या संस्थेने विक्रमी किंमत मोजत हा कॉम्युटर विकत घेतला असून तो संस्थेच्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे. अॅपल वन हे फक्त संशोधन नव्हते तर या शोधाने डिजिटल क्रांतीचा पाया रचल्याने यासाठी आम्ही इतकी किंमत मोजल्याचे संस्थेने म्हटले आहे. 

अॅपलने सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक्स रिटेलर बाइट शॉपचा मालक पॉल ट्रेल यांनी दिलेल्या ऑर्डसनुसार ५० अॅपल वन कंप्युटर बनवले होते. जे ट्रेलने ४१ हजार रुपयांना एक या दाराने विकले होते. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जॉब्स आणि वॉजनियाक यांनी आणखीन १५० कंप्युटर तयार करुन ते आपल्या मित्रांना आणि इतर दुकानदारांना विकले. याआधीही एका लिलावामध्ये अॅपलचा एक 'अॅपल वन' दोन कोटी ३३ लाख तर दुसरा पावणे चार कोटींना विकला गेला होता. 



-Maharashtra Times

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search