७/२२/२०१४

सिडकोच्या घरांची जाहिरात प्रसिद्ध, 1 ऑगस्टपासून अर्ज विक्री



 नवी मुंबईतील सिडकोच्या घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. पण काही कारणास्तर अर्जाची विक्री पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं आता अर्जांची विक्री एक ऑगस्टपासून सुरु करणार असल्याचं सिडकोकडून सांगण्यात आलं आहे. नवी मुंबईतील खारघर सेक्टर 36 मध्ये सिडकोच्यावतीनं नवा गृहप्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ही जाहिरात प्रसिद्ध झाली असली तरी त्या घरांची विक्री अर्ज पुस्तिकेचा अद्याप पत्ता नाही. संकुलातील घरांना कर्जपुरवठा करणाऱ्या वित्तसंस्थांशी सामंजस्य करार न झाल्यानं अर्जविक्री रखडल्याचं सिडकोच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

सिडकोच्या या नव्या गृहप्रकल्पाच्या माध्यमातून 3250 घरांची निर्मिती केली जाणार आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 704 सदनिका आहेत. यामध्ये 280 चौ. मिटरचा कार्पेट एरिया असून याची किमंत 15 लाख 78 हजार 300 रूपये इतकी आहे.  या योजनेतील घरासाठी अर्ज दाखल करताना 25 हजार रुपये अनामत रक्कम सिडकोला भरावी लागणार आहे.

या सोबतच अल्प उत्पन्न गटातील ग्राहकासाठी 2590 सदनिका असणार आहेत. यामध्ये 340 चौ. मिटरचा एरिया असून याची किमत 23 लाख 93 हजार इतकी आहे. या सदनिकांसाठी अनामत रक्कम म्हणून 50 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

त्यामुळे आता या घरांसाठी येत्या 1 ऑगस्टपासून अर्जांची विक्री सुरु होणार आहे.

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search