४/२३/२०१४

चला मतदान करू या "


मुंबई, ठाण्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी गुरुवार, २४ एप्रिल रोजी मतदान होत आहे. आयत्यावेळी मतदार यादीतील नावाचा घोळ टाळण्यासाठी मतदारांनीwww.ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन मतदार यादीत आपले नाव असल्याची खातरजमा करून घ्यावी. http://loksa.in/vvT80636 ‪#‎Elections2014‬ ‪#‎ivote‬
मतदार ओळखपत्राशिवाय ११ अधिकृत ओळखपत्रे
- पासपोर्ट
- वाहन परवाना
- केंद्र शासन/राज्यशासन/सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम/सार्वजनिक मर्यादित - कंपन्यांनी त्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेले छायाचित्र ओळखपत्र
- छायाचित्र असलेले बँक/टपाल खात्याचे पासबुक
- पॅनकार्ड
- आधार कार्ड
- नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर'अंतर्गत स्मार्ट कार्ड
- मनरेगा जॉब कार्ड
- कामगार मंत्रालयाकडून देण्यात आलेले स्वास्थ्य विमा स्मार्ट कार्ड
- छायाचित्र असलेले सेवानिवृत्तीचे कागदपत्र
- निवडणूक विभागाने दिलेली प्रमाणित छायाचित्र मतदारचिठ्ठी

तुमचं 'एक'मत…!सामाजिक बदल घडवू शकतो…आर्थिक विकास घडवू शकतो…देशाची सुरक्षा अबाधित राखू शकतो…पर्यावरण व प्रदूषण बाबत सजगता आणू शकतो…सर्व सामान्याचे स्तर उंचावू शकतो…दिन दुबळ्यांना न्याय देवू शकतो…भ्रष्टाचाराला आळा घालू शकतो…आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस भूमिका मांडू शकतो…अतिरेकी कारवायांना रोखू शकतो… माझ एक मत…स्थिर सरकार देवू शकतं…हे सार करण्यासाठी "चला मतदान करू या "

टिप्पणी पोस्ट करा

Whatsapp Button works on Mobile Device only

Start typing and press Enter to search